ओहमचा नियम ( Ohm ' s Law ) : मंडलामधुन वाहणारा प्रवाह , हा मंडलाचा पुरवठा आणि मंडलामधील विरोध यांवर अवलंबुन असतो . ओहम या शास्त्रज्ञाने दाब , प्रवाह आणि विरोध यामधील संबध पुढील प्रमाणे स्पष्ट केला .
तापमान स्थिर असताना , एखाद्या पूर्ण मंडलामधून वाहणारा प्रवाह ( I ) हा त्या मंडलाला पुरविलेल्या दाबाच्या ( V ) समप्रमाणात आणि मंडलामधील विरोधाच्या ( R ) व्यस्त प्रमाणात बदलतो.
हा नियम सुत्ररूपाने पुढील प्रमाने दर्शवता येईल.
I=V/R
R=V/I
V=I*R.
नियमाचे स्पष्टीकरण : भौतिक परिस्थिती कायम असताना कोणत्याही पूर्ण मंडलामध्ये , दाब वाढला कि मंडलामधुन वाहणारा प्रवाह वाढतो , दाब कमी झाला कि प्रवाह कमी होतो . त्याचप्रमाणे मंडलामधील विरोध वाढला कि मंडलामधुन वाहणारा प्रवाह कमी होतो आणि विरोध कमी झाला की प्रवाह वाढतो.
Power : पूर्ण मंडलामधुन प्रवाह वहात असताना एखादया साधनामध्ये उष्णतेच्या स्वरुपात खर्च होणारी उर्जा म्हणजे त्याची पॉवर होय. ही उर्जा त्या साधनाभोवती होणारा voltage drop आणि त्यामधुन वाहणारा current यांवर अवलंबून असते . थोडक्यात,
Power =Voltage x Current.
उर्जा मोजण्याचे एकक Watt हे आहे . क्षमतेपेक्षा अधिक उर्जा ( Power ) साधनास दिली गेल्यास साधन खराब होण्याचा धोका असतो.
P = V×P :P= IXRXI :P = I2R :P=V2/R.
Kirchoff ' s Laws: गुंतागुंतीच्या मंडलामधील विद्युतप्रवाह आणि विद्युतदाब काढण्यासाठी किरचॉप्सचे नियम वापरले जातात.
1. KCL ( Kirchoff ' s Current Law ) : मंडलामधील एखाद्या जंक्शन बिंदुकडे येणा - या प्रवाहांची बेरीज ही , त्या जंक्शन बिंदुकडुन जाणा - या प्रवाहांच्या बेरजेइतकीच असते म्हणजेच जंक्शन बिंदु वरील प्रवाहांची बैजिक बेरीज शुन्य असते .
2. KVL ( Kirchoff 's Voltage Law ): पुर्ण मंडलामधील विविध विरोधाभोवती खर्च होणा - या विद्युतदाबांची बेरीज , मंडलास पुरविलेल्या विद्युत पुरवठ्याच्या किंमतीइतकीच असते . म्हणजेच मंडलाचा विद्युतपुरवठा आणि मंडलामधील होल्टेज ड्रॉप्स यांची बैजिक बेरीज शुन्य असते.
Joule ' s law of heating element ( जुल्स हिटींग लॉ ) : जुल्स या शास्त्रज्ञाने आपल्या प्रयोगाव्दारे असे सिध्द केले की एखादया कंडक्टरमधून विद्युत करंट सोडल्यास निर्माण होणारी उष्णता ही ,
1. करंटच्या वर्गाच्या (I²) प्रमाणात बदलते .
2. कंडक्टरच्या रेझिस्टन्सच्या ( R ) प्रमाणात व करंट वाहण्याच्या वेळेच्या ( t ) प्रमाणात बदलते .
0 Comments